आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी रूग्णालयात असणाऱ्या रूग्णावर जादूटोणा झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला आहे. संबंधित प्रकार हा रूग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधील वरद हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी तंत्रमंत्र म्हणत जादूटोणा करून, उपचार करण्याचा प्रयत्न केला जात होता. याला डॉक्टरांनी विरोध केला असता, त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.
हे ही वाचा : भ्रष्टाचारांच्या आरोपांवर नारायण राणेंचा धक्कादायक दावा, म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून, एकनाथ शिंदेंनी…
दरम्यान, या जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं सावट?; आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत दिली अपडेट, नवी नियमावली जाहीर”
चंद्रकांत पाटलांनी प्रचार केलेल्या गावात राष्ट्रवादीने मारली बाजी
ठाकरे गटाला आणखी एक झटका; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश