आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले असून यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून, राष्ट्रवादी 2 नंबरचा पक्ष ठरला आहे. मात्र आता अशातच विजयी झालेल्या उमेदवारचं औक्षण करताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील खटाव ग्रामपंचायतचे भाजपचे निवडून आलेले सरपंच रावसाहेब बेडगे यांचं महिला औक्षण करत असताना कार्यकर्त्यांनी अंगावर गुलाल टाकला. या गुलाबाचा आगीश संपर्क आल्याने भडका उडाल्याने रावसाहेब बेडगे यांच्यासहीत दोनजण जखमी झाले आहेत. या सर्वांवर खाजगी रूग्णालयात उपचार सूरू आहेत.
हे ही वाचा : चंद्रपूरमध्ये मनसेचा भगवा फडकला, दाताला ग्रामपंचायतीवर मनसेचं वर्चस्व
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील खटाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे रावसाहेब बेडगे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आले. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. विजयी रावसाहेब बेडगे यांना महिला औक्षण करत असताना कार्यकर्त्यांनी चुकून गुलाल अंगावर टाकला. आगीचा गुलालाशी संपर्क आल्याने मोठा भडका उडाला. यात बेडगे यांच्यासह दोनजण जखमी झालेत. या सर्वांवर मिरजेतील खाजगी रूग्णालयात उपचार सूरू आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
अमोल कोल्हेंनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
निवडणुकांपूर्वीच अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
खुजगाव ग्रामपंचायत निडणुकीमधे “शिट्टी” वाजण्याची दाट शक्यता…