शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

0
149

मुंबई : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

लोक संकटात असताना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोविडने मला गाठलंच, मी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात  उपचार घेत असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझं बळ आहे, असं अर्जुन खोतकर यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपापली कोरोना टेस्ट करून घ्यावी. घरीच रहा, सुरक्षित रहा. सर्वांनी शासनाच्या निर्देशनाचे पालन करावे व सुरक्षित राहावे, अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी केली आहे.

https://www.facebook.com/arjunkhotkarjalna/posts/2178876742257389

महत्वाच्या घडामोडी- 

शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे- संजय राऊत

“फार मोठी चूक करताय; सुचक वक्तव्यासह कंगना रणाैतने मुंबई सोडली”

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी मराठा आरक्षणबाबतीत पंतप्रधान मोदींना निवेदन द्यावे- छत्रपती संभाजीराजे

“तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here