नांदेड : शिवसेनेचा वाघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पिंजऱ्यात अडकलाय, असं वक्तव्य केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
शिवनी जामगा या गावात बौद्ध कुटुंबावर सामूहिक हल्ला करण्यात आला होता. याच पार्श्वभुमीवर रामदास आठवले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आणि नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
ठाकरे सरकार दलितांवर होत असलेले अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप रामदास आठवलेंनी यावेळी केला. महाराष्ट्रात 3 पक्षाचं मिळून सरकार आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी शिवसेनेचा हा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकून पडला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा केवळ राज्यातील विरोधीपक्षाने आणलेल्या दबावामुळे घेतला आहे. तसेच आम्ही धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्यासाठी आग्रही असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
“देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर”
“जयंत पाटील यांच्यानतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण”
माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार- चित्रा वाघ