आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोला : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप सोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. त्यानंतर आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता शिवसेनेचं बळ वाढणार आहे.
शिवसेना खासदार खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात अकोल्यात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री तसेच माजी आमदार संजय देशमुख यांनी अरविंद सावंत यांची गुप्त भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “शिवसैनिकच आगामी निवडणुकीत शिंदेला गटाला जागा दाखवतील”
दरम्यान, अकोला येथे खासदार सावंत यांची भेट घेण्यापूर्वी देशमुख यांनी मुंबईला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नंबर वन; तब्बल 22 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
ग्रामपंचायत निकाल 2022! अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला, 6 पैकी 2 जागांवर मारली बाजी
शिवसेनेनंतर शिंदे गटाचा आता भाजपलाही धक्का, तब्बल 100 महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश”