आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दादरा नगर हवेलीच्या निवडणुकासाठी शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून शिवसेनेनं आपली ताकद पणाला लावली आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर लोकसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवार म्हणून घोषित केलं.
हे ही वाचा : फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव करत दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकवला.
महत्वाच्या घडामोडी –
“देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”
…तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल- संजय राऊत
“ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”