आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : डोंबिवली जवळील 27 गाव ग्रामीण भागातील मनसेच्या दोन नगरसेवक आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील एका संचालकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेतील एका उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा : शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…
मनसेच्या स्थानिक नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, बैठका घेतल्या जात नाहीत. ठराविक कोंडाळ्यात स्थानिक नेतृत्व असल्याने मनसेत काम करणे अवघड झाल्याने तिन्ही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं शिवसेनेतील सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच राज ठाकरेंना त्रास सुरू झाला; शिवसेनेचा हल्लाबोल
बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणे त्रास दिला, तेच आज…; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल