Home महाराष्ट्र शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा दंगल व्यवस्थित हाताळली नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दंगल चांगल्या पद्धतीने हाताळली होती. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात दंगल होऊ दिली नाही. भाजपा सरकारने दंगल वाढवण्याचा विषय अजिबात येत नाही. कारण सरकार भाजपाचं असलं तरी दंगल करणारे भाजपाचे नव्हते. दंगल करणारे सर्व लोक स्थानिक होते.” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

हे ही वाचा : आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच राज ठाकरेंना त्रास सुरू झाला; शिवसेनेचा हल्लाबोल

दंगल करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरही पक्षातील तरुण होते. तेव्हा झालेली दंगल वडू गावातील घटनेमुळे झाली होती. ती दंगल व्यवस्थित हाताळली नाही असंही नाही. ही दंगल एका दिवसात 1-2 तासांचीच होती. त्यानंतर महाराष्ट्रात कुठलीही दंगल घडली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या मताशी मी सहमत नाही,” असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ते सांगलीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“हैदराबाद हादरलं! मुस्लीम तरूणीशी लग्न केलं म्हणून हिंदू तरूणाची हत्या; तरूणी म्हणाली, माझ्या डोळ्यासमोर…”

बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणे त्रास दिला, तेच आज…; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबीयांचा यात काहीही संबंध नाही; भाजप नेत्याचं वक्तव्य