आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : ‘पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागल पाहिजे, असं शिवसेनेचे नते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
“बारामती आपली नाही, असे का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही. पण संघटनेची ताकद वाढायला हवी. कधी वाटल होतं का आपण पुरंदरला जिंकू? हासुद्धा बारामतीचाच भाग आहे. आपण जिंकू शकतो, ही सकारात्मक भावना ठेवली पाहिजे” असं संजय राऊत म्हणालेत.
दरम्यान, राजकारणात बारामती म्हणजे सत्ता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच, असे समीकरण आहे. संजय राऊत यांच्या उल्लेखित वक्तव्यानंतर शिवसेनेची बारामतीवर नजर आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचं काम रखडलं- चंद्रकांत खैरे
“हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक! आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी दणदणीत विजय”
पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार; जयंत पाटलांनी सांगितला मास्टर प्लॅन
जेवणाच्या ताटावरून उठवलं, आणखी कशावरून उठवायचं सांगा; संजय राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा डिवचलं