“शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सूरूच; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
751

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आता स्थितीत आता शिवसेनेत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

नांदेड उत्तरमधील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : राणेंची मुलं लहान, त्यांना समज देण्याचं काम फडणवीस करतील- दीपक केसरकर

दरम्यान, यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनूरकर, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, शहराध्यक्ष शुभम पाटील नादरे, तालुका सचिव ओम पाटील ढगे, शहर उपाध्यक्ष नागेश पाटील मोरे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष अजय देणे, जिल्हा सचिव संतोष पाटील नादरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कैलास पाटील जोगदंड, तालुका संपर्कप्रमुख गोपाळ पाटील कदम, नायगावचे तालुकाध्यक्ष मारुती पाटील होले, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी माधव दाळपसे यांनी आज शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

धनुष्यबाण कुणाला द्यावं, शिंदे गटाला की उद्धव ठाकरेंना?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

रोहित शर्माच्या षटकारामुळे स्टेडियममधील चिमुकली जखमी; व्हिडिओ व्हायरल

उद्धव ठाकरेंनी आज बाळासाहेबांसारखा निर्णय घेतला; शिंदे गटातील आमदाराकडून काैतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here