“शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादीचे ‘ते’ 5 नेते आज शिवबंधन हाती बांधणार”

0
522

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : बीड नगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊ ठेपली आहे. अशातचं काका आणि पुतणे पुन्हा आमने- सामने आले असून काका पुन्हा एकदा पुतण्यावर कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या गटातील 5 नेते फोडण्यात यश मिळवलं आहे.

राष्ट्रवादीचे गंगाधर घुमरे, फारूक पटेल, नितीन लोढा, अमर नाईकवाडे आणि बाबूशेठ लोढा हे नेते आज शिवबंधन हाती बांधणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजता त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत प्रवेश”

दरम्यान, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती मिळाली आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे किती भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे- चंद्रकांत पाटील

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी 

करुणा शर्मा -धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार- करुणा शर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here