“शिवसेनेची मोठी खेळी; मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
911

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं आगामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेच्या 2 मोठ्या नेत्यांनी शिवबंधन हाती बांधलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

हे ही वाचा : राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मनसेचे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव व पूजा गजानन पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. तसेच यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मनसे कल्याण तालुका प्रमुख गजानन पाटील यांनीही यावेळी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

डोंबिवली ग्रामीणमध्ये शिवसेनेचा मनसेला खिंडार; मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार?

शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच राज ठाकरेंना त्रास सुरू झाला; शिवसेनेचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here