आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढच नाही तर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामिल झाले. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांची बीड ते मुंबई पायी ‘निष्ठा’ यात्रा
आज मातोश्री येथे बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील धांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसंच शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला.
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले. गेल्या चार वर्षांपासून सचिन तायडे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. सामाजिक व्याख्याते म्हणून सचिन तायडे यांची मोठी ओळख आहे. अंबादास दानवे, सचिन अहीर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
वेदांता-फाॅक्सकाॅननंतर आता ‘हा’ मोठा प्रकल्पही राज्याबाहेर?; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा, म्हणाले…
“नाशिकमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन; रस्त्यावर पिंडदान करत केली ‘ही’ मोठी मागणी”
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..