शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; पालघरमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला सेनेचा भगवा

0
1083

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि तलासरी विभागांतील भाजपा आणि बहुजन विकास आघाडी पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “… त्यामुळे 2024 ला मोदीचं सत्तेत येणार आहेत”

तलासरी नगरपंचायतीतील भाजप नगरसेवक आशिर्वाद रिंजड, भाजप नगरसेविका सौ.रिजवाना खाटीक, उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दुर्गाप्रसाद (पप्पू) यादव, भाजपचे पालघर जिल्ह्याचे युवा चिटणीस मेहुल महाले, भाजपचे सदस्य संदीप वरखंडे, भाजप सदस्य राजेश डोंबरे, बहुजन विकास आघाडीचे मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती नवसो सोमा दिखा आणि सामाजिक कार्यकर्ते ढवळू धोडगा यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात; सदाभाऊ खोत यांची टीका

“भाजप-मनसे युती होणार?; लवकरच चांगली बातमी मिळेल”

ज्यांच्या नवऱ्याने लाच खालली त्या आम्हांला हिशेब मागत आहेत; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here