“शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; रत्नागिरीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश”

0
392

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : “देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?”

भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय राऊतांनी शशिकांत मोरेंचं अभिनंदन केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनावर मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र दिवसेंदिवस वाढणारी महागाई पाहून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. तसेच विरोधकांना बदनाम करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचाही गैरवापर केला जात आहे, असा आरोप करत केवळ शिवसेनाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देईल, असा विश्वास शशिकांत मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

…तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; किरीट सोमय्यांचं थेट ठाकरे सरकारला आवाहन

“आगामी निवडणुकीच्याआधी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दोन नेत्यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

मंत्रालय बंद, ‘दुकानदारी’ सुरू; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here