मुंबई : सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या धुळे- नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार व किसान संघर्ष पॅनेलचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दणदणीत विजय मिळवला असल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा : मनसेचा एमआयएमला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात किसान संघर्ष पॅनेलच्या तीन तर शेतकरी विकासचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पॅनल मधून चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत संदीप वळवी हे देखील विजयी झाले आहेत.
दरम्यान, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील किसान विकास पॅनलला आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलनं आव्हान दिलं होते. तसेच बँकेच्या 17 जागांपैकी 7 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर 10 जागांसाठी 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीची ताकद वाढणार; पक्ष मजबूतीसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘या’ चेहऱ्यांना संधी
मुंबई महापालिकेने बाबासाहेब पुरंदरेंच्या कलादालनाची निर्मिती करावी; भाजपची मगाणी
महाविकास आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची टीका