Home महाराष्ट्र जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; चार कार्यकारी सोसायटीत एकनाथ खडसेंचं सहकार...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; चार कार्यकारी सोसायटीत एकनाथ खडसेंचं सहकार पँनेल विजयी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झालं आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचेच वर्चस्व असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा विजयी डंका; धुळे बँक निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचा दणदणीत विजय

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीत रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात चित्र पालटलं आहे. माघार घेतलेल्या सहकार पॅनलच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन या एका मताने विजयी झाल्या. तर ज्यांना पाठिंबा दिला ते अरुण पाटील पराभूत झाले. जनाबाई गोंडू महाजन यांना 26 मते मिळाली तर अरुण पांडुरंग पाटील यांना 25 मते मिळाली आहे. तर भुसावळ मध्ये भाजपचे आमदार अपक्ष उमेदवार संजय सावकारे विजयी झाले आहेत.

दरम्यान, यावल कार्यकारी सोसायटी मतदार संघात महविकास आघडी प्रणित सहकार पॅनलचे विनोद पंडित पाटील विजयी झाले, चोपडा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल विजयी झालेत.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचा एमआयएमला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; पक्ष मजबूतीसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘या’ चेहऱ्यांना संधी

मुंबई महापालिकेने बाबासाहेब पुरंदरेंच्या कलादालनाची निर्मिती करावी; भाजपची मगाणी