आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. मात्र या या मेळाव्यात भाजपचे 3 ते 4 भाजप नगरसेवक नगरसेवकांनी हजेरी लावत थेट मंचावर जाऊन संजय राऊत यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे नाशकात भाजप नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. सकाळी शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे संपन्न झाले. त्यानंतर राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी संवाद मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्यासह 3 ते 4 विद्यमान नगरसेवकांनी उपस्थिती लावली होती. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. पण, भाजपचे नगरसेवक विशान संगमनेरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांचा सत्कार केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा :ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन; तब्येतीची केली विचारपूस
भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे ही सुरुवात आहे. काल पासून 17 ते 18 नगरसेवक मला भेटून गेले आहे. क्षितिजावर फक्त शिवसेनेचा सूर्य तळपत राहील. सरकार पडणार पडणार म्हणणाऱ्यांनी हे बघावं.शपथ घेतली तेव्हा पासून सरकार पडणार म्हणतात मात्र पुढील ५ वर्षे आपली आहे. शिवसेना माघे हटणार नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने शब्द फिरवला आणि लढाईला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला तो फिरवला, आमची फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणा विरोधात लढलो. बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने शब्द खरा झाला. रामायण-महाभारत कशामुळे झाले, खोटेपणामुळे झाले. रोज आमच्यावर हल्ले होत आहेत, जणू रोज भ्रष्टाचारचे पीक येतं की काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘सरकार तुमचं आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा’; इम्तियाज जलील यांचा इशारा
…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले; पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
संजय राऊतांना हिंदुत्व कळलेले नाही, यासाठी…; नारायण राणेंची टीका