“शिवसेना यंदा साजरी करणार भगवी दिवाळी; औरंगाबादमध्ये 50 हजार घरांवर फडकवणार भगवा”

0
430

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेनेकडून विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.

मनपाच्या निवडणुकीसाठी हिंदुत्वाची धार बळकट करण्याकरिता शिवसेना या वर्षी औरंगाबादमध्ये 1 ते 3 नोव्हेंबरदरम्यान ‘ध्वज दिवाळी’ मोहीम राबवणार आहे. यात शिवसेना शहरातील 50 हजार घरांवर भगवा ध्वज फडकवणार आहे. आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. तसेच या मोहिमेची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात…

दरम्यान, येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी शहरात भगवी दिवाळी म्हणून साजरी होणार असं चित्र दिसून येत आहे

महत्वाच्या घडामोडी – 

मनसेचा राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते…; धनंजय मुंडेंचा पलटवार

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकित 64 टक्के मतदान; भाजप का काँग्रेस, मतदारांचा कौल कुणाला?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here