“औरंगाबादेत शिवसेनेचा मोर्चा; मनसेची टीका, मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा…”

0
867

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद :  देशात उडालेला महागाईचा भडका, गगणाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती यासह अन्य दरवाढीच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिवसेनेच्या वतीने औरंगाबादमध्ये महागाईविरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र या मोर्चावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे.

हे ही वाचा : कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बायका-पोरांसह मोर्चा

महागाईच्या विरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? पाणी पुरवठा योजना कधी पूर्ण होणार, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर कधी करणार? हे सांगावं, असं म्हणत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिवसेनेकडे या प्रश्नांची उत्तरे असतील तरच त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. टोला सुहास दाशरथे यांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात आज शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व

“खोत आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू”

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here