Home महाराष्ट्र “शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”

“शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”

मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत चालले आहेत. त्यावरुन शिवसेनेनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलवर मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर त्यावेळी 2 रुपयांनी कमी केले, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे

माझी वाट लागली तरी चालेल, पण ‘त्याला’ संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही- शिवेंद्रराजे भोसले

मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार- सुप्रिया सुळे

“आता वर्ष उलटलं, 5 वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल”