Home महत्वाच्या बातम्या शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खासदार डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन

शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खासदार डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आज डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्या पार्श्वभूमीवर डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर लगेचच कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला.

दरम्यान, डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव लिहिलं होते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

पवार कुटूंबाला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा?; किरीट सोमय्यांचा घणाघात

अजित पवार आणि बहिणींवर आयकर विभागाच्या धाडी प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”