Home महाराष्ट्र सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत- नितेश राणे

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत- नितेश राणे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर एबीपी माझाशी बोलतानी भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावंसं वाटलं, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत. आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचं नावच घेतलं नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“काॅंग्रसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण”

वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो; ‘सामना’ अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

कोरोना व्हायरसची ‘ती’ काॅलरट्यून आता बंद करा; मनसेची मागणी

राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये- रुपाली चाकणकर