“जिथे संकट तिथे शिवसेना, हा इतिहास आहे”

0
404

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : जिथे संकट तिथे सर्वप्रथम शिवसेना, हा इतिहास आहे. त्यामुळे ऊन असो वारा असो पावसात मदत असो अथवा महामारी अशा कित्येक संकटांना शिवसैनिक तोंड देतात., असं प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं.

हे ही वाचा : पुरात वाहून आलेले पुण्याच्या स्वयंघोषित दादांनी आपल्या मतदारसंघात…; रूपाली पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

गावागावात, शहरात शिवसेनेच्या शाखा या सर्वसामान्यांचे हक्काचे आशास्थान बनल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक रचनेचा सर्वत्र गौरव होत आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. ते लातूर येथे मित्रनगर व प्रभाग 9 खोरी गल्ली येथे शिवसेना शाखांच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय माध्यम व न्यायालयाने केलेल्या कौतुकातून समोर आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाचा वेग दुपटीने करण्यासाठी आशीर्वाद असू द्या. तसेच नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा., असं आवाहन चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…

राष्ट्रवादीची कबर महाराष्ट्र खोदल्याशिवाय राहणार नाही; भाजप नेत्याचा इशारा

‘..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो’; भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here