आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. तर शिवसेनेला दारूण पराभव पत्कारावा लागला. यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली. मात्र असं असलं तरी उत्तर प्रदेशातील एका जागेवर शिवसेनेमुळं भाजपला पराभवाचा धक्का बसला.
उत्तर प्रदेशातील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शैलेंद्र ऊर्फ राजू श्रीवास्तव उभे होते. या निवडणुकीत राजू श्रीवास्तव यांना 3698 मते मिळाली. तर समाजवादी पार्टीचे उमेदवार सईदा खातून या 84586 मते घेऊन विजयी झाल्या. तर भाजपचे उमेदवार राघवेंद्र प्रताप सिंह यांना 84095 मते मिळाली. त्यामुळे राघवेंद्र प्रताप सिंह यांचा केवळ 771 मतांनी पराभव केला.
हे ही वाचा : ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे- चंद्रकांत पाटील
दरम्यान, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार नसता तर सिंह यांच्या पारड्यात ही 3698 मते गेली असती आणि त्यांचा विजय झाला असता. मात्र, शिवसेनेने राघवेंद्र यांची मते खाल्ल्याने त्यांचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे- चंद्रकांत पाटील
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरलं पाहिजे, कारण…; चंद्रकांत पाटलांचा सल्ला
भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई होणार; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा