“गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक; निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”

0
709

मुक्ताईनगर : शिवसेना नेते तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये एका कार्यक्रमात कव्वाली सादर केलं होती. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता.

हे ही वाचा : हेराफेरी-4 साठी परफेक्ट काॅम्बिनेशन, त्यात नवाबला ‘बाबू भाई’ चा रोल द्या- नितेश राणे

निलेश राणेंनी यासंदर्भात ट्वीटवरून शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्याविरोधात आता जळगावमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून  निलेश राणे यांच्याविरोधात मुक्ताईनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भाई यांनी ही तक्रार दाखल केलीय.

निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानूसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सांगली जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात आणि भाजपा गटत जोरदार राडा

किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार- नाना पटोले

 नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहां- चित्रा वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here