आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नेवासे (अहमदनगर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच भाजपच्या शिलेदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
भाजपचे तालुका उपाध्यक्ष, नेवासे बुद्रुकचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह 35-40 भाजप कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. शिवसेना नेते व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
हे ही वाचा : महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, नेवासे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विरोधाकांनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले, तरी मी या मंत्रिपदाचा वापर नेवासे तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणून कामे मार्गी लावण्यासाठी करणार आहे, असं गडाख यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, तर त्यांच्या आदर्शावर चला”
“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”