आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात 2024 मध्ये उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : जनतेनंही ठरवलंय, 2024 मध्ये बदल हवाच, उघड दार देवा आता उघड दार…
बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे म्हणे. शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी केली आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली हे बरं खपवून घेतलंत, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनाच पसंती आहे आणि पवार यांनी पुणे येथील खासगी चर्चेत हे मत व्यक्त केलं असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे म्हणे.
शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी केली आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली हे बरं खपवून घेतलंत… pic.twitter.com/uhUaUuHiNO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राजकारण करायचंय, तर समोरून करा, कुटूंबावर हल्ला कशाला; सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या
मनसे म्हणजे गळकं घर, तर शिवसेना म्हणजे चिरेबंदी वाडा; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मनसेला टोला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन