कल्याण : राज्यात शिवसेना-भाजपमध्ये एकमेकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. तसेच एकमेकांवर टीका केली जाते. मात्र कल्याण तालुक्यातील मानिवली गावात सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीवेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे.
कल्याण तालुक्यातील उर्वरीत 10 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक आज पार पाडली. मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपने एकत्रित येत भाजपचा सरपंच तर शिवसेनेचा उपसरपंच बसविला आहे.
दरम्यान, राज्यात काही वाद असो गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असं वक्तव्य निवडून आलेल्या सरपंच-उपसरपंचांनी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”
शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं आणि अमित शाह हे खरं बोलले- चंद्रकांत पाटील
एकिकडे मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची आणि दुसरीकडे…; आशिष शेलारांची टीका
अमित भाईंच्या पायगुणानं महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल- चंद्रकांत पाटील