आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर अनेकांचा शिंदे गटात जाण्याचा कल वाढला. अशातच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : “शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा दणका; ‘या’ आक्रमक महिला नेत्या करणार शिंदे गटात प्रवेश?”
राष्ट्रवादीचे दादा मुलाणी यांच्यासह फोंडशिरस, मांडवे व परिसरातील सुमारे तीनशे कार्यकर्त आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, तानाजी सावंत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात नातेपुते व सोलापूर येथे मिळून सुमारे एक हजार कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तानाजी सावंत यांचा गट पुन्हा मजबूत होताना दिसून येत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
सदस्य संख्या इतकी वाढवा की…; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
‘…या कराणामुळे एकनाथ शिंदे चिंतेत’; उद्धव ठाकरे घेणार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ?