आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता कोल्हापूरात शिंदे गटात प्रवेश केलेला हा नेता पुन्हा स्वगृही परतला आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; गणपतीचे घेतले दर्शन, म्हणाले..
कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. अवघ्या 15 दिवसांमध्येच फराकटे शिंदे गटातून परतले आहेत. फराकटे यांनी पत्रक काढत शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं.
आपण मालोजीराजे आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचं दिगंबर फराकटे यांनी या पत्रकात स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता ‘या’ राज्यातील 40 आमदार नाॅट रिचेबल, चर्चांना उधाण
“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”