Home महाराष्ट्र शिंदे गट-मनसे युती होणार?; राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

शिंदे गट-मनसे युती होणार?; राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे.

मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये युतीची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 18 सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे त्यांचा मुक्काम असेल.

हे ही वाचा : आमचा पैठणचा बोका हा खोक्यावर जाणारा नाही, याची आम्हांला…; भर सभेत मुख्यमंत्र्यांसमोर रावसाहेब दानवेंचं विधान

राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केलं आहे.

बांद्रा येथे आले असता त्यांना तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहात, असा सवाल पत्रकारांनी राज यांना केला असता, राज यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. सध्या काही डबे जोडण्याचे काम सुरू आहे. मला रेल्वेचा प्रवास आवडतो. त्यामुळे मी रेल्वेनेच नागपूरला जात असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, आगामी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी मनसे-शिंदे गट युती होणार?”

नाना पटोलेच काही दिवसांनी भाजपमध्ये येतील, मात्र आम्ही…; नितीन गडकरींना आलेल्या ऑफरवर भाजपचं प्रत्युत्तर

शिंदे गट- शिवसेनेचा वाद; मनसेची प्रतिक्रिया