शिखर धवन-प्रभसिमरण सिंगची विस्फोटक खेळी, अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पंजाबची राजस्थानवर 5 धावांनी मात

0
149

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गुवाहाटी : आयपीएलचा 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आज आयपीएलचा 8 वा सामना आज राजस्थान राॅयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 5 धावांनी पराभव केला.

या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट गमावत 197 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 56 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीत धवनने 9 चाैकार , 3 षटकार ठोकले. तर प्रभसिमरन सिंगने 34 चेंडूत 60 धावांची खेळी केली. तर राजस्थानकडून जेसन होल्डरने 2, तर आर अश्विन, युझवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणू नका, अन्यथा…; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना इशारा

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ निर्धारित20 षटकात 7 विेकेच गमावत 193 धावांपर्यंत पोहचू शकला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानला 5 धावांनी पराभव पत्कारावा लागला. शेवटच्या षटकात 15 धावांजी गरज असताना राजस्थानच्या संघाला केवळ 10 धावाच करता आल्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 25 चेंडूक 42 धावांची खेळी केली. तर शिमरन हेटमायरने 18 चेंडूत 36 धावा, तर युवा ध्रुव जोरेलने 15 चेंडूत 32 नाबाद 32 धावांची खेळी केली. मात्र ते राजस्थानला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. तर पंजाबकडून नॅथन इलिसने 4, तर अर्शदिप सिंगने 2 विकेट घेतल्या.

त्त्वाच्या घडामोडी 

…तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर येऊन दाखवाच; सुषमा अंधारेंचं, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

…त्यामुळे उद्धव ठाकरे तुरूंगात जाणार?; नारायण राणेंचं मोठं विधान ‌

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपचा ‘हा’ नेता हाती बांधणार घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here