“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
466

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे विरुद्ध भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले असा सामना रंगला आहे. यातच आता शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का दिला.

आमदार शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनी अनेक समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवेंद्रराजे भोसलेंना एक ऑफरही दिली होती. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती.

महत्वाच्या घडामोडी –

उत्तरप्रदेश निवडणूकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार

2 ऑक्टोबरपासून अनिल परबांचे बेकायदेशीर कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार; किरीट सोमय्यांचा दावा

“ठाकरे सरकार पडत नसल्याने चंद्रकांत पाटील अशी विधाने करतायेत”

ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here