Home महाराष्ट्र 2 ऑक्टोबरपासून अनिल परबांचे बेकायदेशीर कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार; किरीट सोमय्यांचा...

2 ऑक्टोबरपासून अनिल परबांचे बेकायदेशीर कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार; किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांचे लोकायुक्तांनी कार्यालय तोडण्याचे आदेश दिले आहेत. लोकायुक्तांसमोर कोर्टात ठाकरे सरकारनेच त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिली, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“अनिल परब यांच्या बेकायदेशीर कार्यालयाचे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना बंगला तोडावा लागला आणि आता डावा हात असणाऱ्या परबांच्या कार्यालयावर कारवाई होणार आहे. 2 ऑक्टोबरपासून हे कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकार पडत नसल्याने चंद्रकांत पाटील अशी विधाने करतायेत”

ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार- नाना पटोले

साताऱ्यात राष्ट्रवादीचा भाजपला मोठा दणका; असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; संजय राठोड यांनी केला खुलासा