Home महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं.  मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही., असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असं शरद पवार म्हणाले. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा : गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही; राज्यपालांचं वादग्रस्त विधान

या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मराठा समाजाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाकडून EWS आरक्षण रद्द

सत्ताबदलावर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

“…तर शिंदे गटातील 3-4 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार?”