Home पुणे शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान झालं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या निकालावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोल्हापूरात भाजपचे धनंजय महाडिक विजयी; शिवसेनेचे संजय पवार पराभूत

मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे.ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही, असं शरद पवार म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरत वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन तेल लावावं आणि…; राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंचा टोला

उद्धव ठाकरेंना न्यायालयाने पुन्हा धडा शिकवला; किरीट सोमय्यांची टीका

राज्यसभा निवडणूकीत MIM कुणाला पाठिंबा देणार?; शिवसेना की भाजपला?; इम्तियाज जलीलांनी जाहिर केलं, म्हणाले…