मुंबई : मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यावर आधारित ‘पॉवर ट्रेडिंग’ हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलल्याचा उल्लेख आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सगळा वृत्तांत सांगितला आहे. शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या सोबत येण्याचे मान्य केले होते. काळाच्या ओघात सर्व घटना उघड होतील, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी मग आम्हाला का नाही?”
मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून रास्ता रोको आंदोलन; सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
“चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही”
सुडाचे उत्तर सुडाने देऊ म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान- प्रविण दरेकर