मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं आहे. यामुळे देशभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम झाला आहे. या संबंधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
भारतातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शेतकर्यांची परतफेड करण्याची क्षमता पूर्णपणे बिघडली आहे. अशा संकटकाळात केंद्र सरकारने हस्तक्षेप करत त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि त्वरित दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं पत्र शरद पवारांनी मोदींना लिहलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस यांच राज्य सरकारला समर्थन; म्हणतात…
लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवारांच स्पष्टीकरण; म्हणतात…
महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय ; रूपाली चाकणकर यांनी केला संताप व्यक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली राहणार