Home महाराष्ट्र महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय ; रूपाली चाकणकर यांनी केला...

महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय ; रूपाली चाकणकर यांनी केला संताप व्यक्त

मुंबई : एबीपी माझा या वृत्तवाहिनीची लोकप्रिय वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या नावाने गेले काही दिवस सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. काय सांगशील ज्ञानदा वरून नेटकऱ्यांनी ज्या पातळीवर जाऊन महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोणतंही वाक्य लिहायचं आणि #काय_सांगशील_ज्ञानदा असं म्हणायंच… ज्ञानदा तुमच्या घरात काम करते का? ज्ञानदा तुमच्याकडे कामाला आहे का?, असं म्हणत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

एक वृत्तनिवेदिका म्हणून तिचा हा सगळा प्रवास आहे. त्यासाठी तिने शंभरदा अभ्यास केलाय. ज्ञानदाला ट्रोल करण्या सारख तिने काय केलयं? तिचं काय चुकलंय?आणि शेवटी चुका या माणसाकडूनच होत असतात. समाज शिकला पण समाज सुशिक्षित झाला की नाही? हाच प्रश्न पडतो, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, रिपोर्टर ते वृत्तनिवेदिका असा तुझा खडतर प्रवास या ट्रोल करणाऱ्यांना कधीच कळणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व महिला तुझ्या सोबत आहोत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली राहणार

लॉकडाऊनच्या काळात चंद्राकांत पाटलांचा नवा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी

“बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार”

कायदा हातात घेतलेल खपवून घेतलं जाणार नाही; धनंजय मुंडेचा जनतेला सूचक इशारा