शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

0
236

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि शिवसेना पक्षाला खिंडार पडलं. या गोष्टीला आता सहा महिने झाले आहेत. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टीका होत आहे. यावरून आता भाजप नेते राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना फोडण्याचं काम राज्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असल्याचा गंभीर आरोप राम शिंदे यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा…अजित दादा; अजित पवारांच्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलणाऱ्या संजय राऊतांनी यावरही बोलावं, असं म्हणत राम शिंदेंनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी; निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा पाठिंबा

…त्यामुळे माझाही, विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या दाव्याने खळबळ

 शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here