Home महाराष्ट्र “शरद पवार-उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

“शरद पवार-उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : देशातील वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेकडून औरगांबाद येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाचं नेतृत्व खासदार संजय राऊत करणार आहेत. यानिमित्ताने संजय राऊत औरंगाबाद येथे आले होते. यावेळी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : कंगणा रणाैतविरूद्ध शिवसेनेचं आंदोलन; कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेनेने कधीच मुस्लिमांना विरोध केला नाही. शिवसेना ही सर्वसमावेशक असल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं. तसेच शिवसेनेने हिंदूत्वाचा आचार आणि विचार कधीच सोडला नसल्याचं राऊतांनी यावेळी म्हटलं. शिवाय आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान असून हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, असं राऊतांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी विविध विषयांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रच काम करत आहेत. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून एकच आहेत, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…तर आज बाळासाहेबांनी संजय राऊतांच्या थोबाडीत दिली असती; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

“औरंगाबादेत शिवसेनेचा मोर्चा; मनसेची टीका, मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा…”

कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बायका-पोरांसह मोर्चा