मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. अशातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कटाचा मास्टरमाईंड आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा बाप कोण? असा प्रश्न विचारावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केली आहे.
एटीएसचे तपास अधिकारी शिवदीप लांडे यांना महाविकास आघाडी सरकार काम करू देत नाहीये. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकार खंडणीबाज की खंडणीबाद हा प्रश्न पडलाय. गृहखात्यात बदली करणं, पैसे घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. माजी आयुक्तांनी महिन्याला 100 कोटी म्हटलंय. यांनी इतर राज्यांमध्ये काही घोळ केलाय का याचा तपास व्हायला हवा. या प्रकरणाची इडीकरून चौकशी व्हायला हवी, असंही प्रसाद लाड म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
आपलं सरकार कसंही वागलं तरी…; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही – जयंत पाटील
परमबीर सिंग लेटर! सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, पण…- शरद पवार
अनिल देशमुखांची कसून चौकशी करा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे- राज ठाकरे