Home देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही – जयंत पाटील

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही – जयंत पाटील

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर  भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केलीय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

परमबीर सिंग लेटर! सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, पण…- शरद पवार

अनिल देशमुखांची कसून चौकशी करा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे- राज ठाकरे

उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत- चंद्रकांत पाटील

हे ठाकरे सरकार जनतेचा पैसा लुटण्यासाठी बनलं आहे- निलेश राणे