Home महाराष्ट्र शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?- आशिष शेलार

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?- आशिष शेलार

मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर आज राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातल्या आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीवर बोट ठेवलं तर तो महाराष्ट्र द्रोह होतो, अशी भाषा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष करते पण दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. पोलिसांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही”, असं शेलार म्हणाले.

आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली? असं म्हणत आशिष शेलारांनी पवार आणि राऊतांवर टीका केली आहे.

रोज वटवट करणारे संजय राऊत आज देशातील पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार कालच्या घटनेवर तुम्हची फेसबुक पोस्ट पोलिसांच्या बाजूने का आली नाही?, असा सवालही शेलारांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत आहे”

बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

रेणू शर्माने बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले, लाज वाटली पाहिजे; भाई जगताप कडाडले