मुंबई : केंद्र सरकारने भीमा कोरेगाव दंगल प्रकरण एनआयए कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन वातावरण चागंलच गरम झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.
केंद्र सरकारचे कृत्य संशयास्पद आहे. सत्य बाहेर येण्याच्या भीतीने घाईने NIA कडे तपास सोपवण्यात आला आहे. अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही, असं म्हणत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशीच्या मागणीनंतर पाच तासात केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेतला, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, एल्गार परिषदेसंदर्भातील खटले खोटे आहेत. तसंच अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने खटले भरले आहेत, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“शरद पवार हे आमचं दैवत; संरक्षण काढून घेणं म्हणजे त्यांचा अपमान”
…म्हणून भाजपने हा तपास एनआयए कडे सोपवला- सचिन सावंत
“दोन झेंड्यांची योजना करणं घसरलेल्या गाडीचे लक्षण”
…तर ती चुकीची गोष्ट आहे; रोहित पवारांचा भाजपला इशारा