शरद पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती; आता नारायण राणे म्हणतात…

0
229

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नवाब मलिकाचा राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  समाचार घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही, असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आता नारायण राणेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे

शरद पवार यांचे मी काही विधान ऐकले, ते म्हणाले नारायण राणेंनाही अटक झाली होती. त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा का घेत नाही. वा… पवार साहेब, काय बोलावं की कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही. आमचा कोणी दाऊद दोस्त नाही आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत. त्या दाऊशी नवाब मलिकचे संबंध आहेत म्हणून त्याला अटक झाली, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा :  यंदा बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे, हाणायचं; ‘राज’गर्जना बरसली

दरम्यान, तुम्ही आमचे राजीनामे मागताय, हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे. म्हणून आम्ही या देशाचे नागरिक असून, या देशाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही इथे होणाऱ्या अन्याविरोधात आवाज उठवणार म्हणून आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही.” असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेत सुसाट इनकमिंग, गोरेगाव येथील अनेक तरूण-तरूणींना हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

पटापट पेट्रोल टँक भरून घ्या, कारण मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार; राहुल गांधींचा टोला

“लढायचं ते जिंकण्यासाठी; पुण्यात मनसेचा नवा नारा, पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here