आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीतील फूटीनंतर, शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, एक मोठं विधान केलं.
अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, असं विधान शरद पवारांनी यावेळी केलं. पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. आता यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : गुवाहाटीला जाऊन काय मिळालं? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
भाजपलाही राष्ट्रवादीत फूट आहे, असं वाटत नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला नेतृत्व हवे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली आहे. राहुल गांधींमध्ये ती क्षमता नाही असं अजितदादांना वाटतंय. आता जर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अजितदादा आमचेच नेते असल्याचं म्हणत असतील तर ही भूमिका सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना मान्य असेल असं समजू. जर मान्य नसेल तर राष्ट्रवादीत वैचारिक मतभेद आहेत असं समजू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ चेहरा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
16 आमदारांच्या अपात्रतेवरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मोठे विधान; म्हणाले…
“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्याची पुन्हा घरवापसी”