मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या मुद्द्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शरद पवार हे महाविकास आघाडीतचे ज्येष्ठ नेते आहे. मुळात पवारसाहेब हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे आजच्या मोदी-पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे, असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे. त्यामुळे जवळ आहे तोवर जवळ, नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते, असंही सुशिलकुमार शिंदेंनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”
“भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो”
“हालचाली तर वाढणारच”; शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”