शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत – चंद्रकांत पाटील

0
262

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतमी अदाणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सावरकर आणि अदाणी प्रकरणात शरद पवारांनी बाजू घेतली की, मध्यस्ती करण्याचे कारणच उरत नाही. शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत. ते असल्याशिवाय सर्व विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत. ते बाहेर पडले की, बाकीचे गळून पडतात. त्यामुळे शरद पवार सावरकरवादी झाले किंवा सावरकरांवर खालच्या स्तरावर टीका करू नका असे सांगत असतील. अथवा अदाणींची चौकशी जेपीसीने नव्हे तर न्यायालयाने करावी, असे म्हणत असतील, तर विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदेंनी, दोनदा शिवसेना सोडली, मात्र त्यावेळी त्यांना…; ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट

दरम्यान, तीन पक्ष एकत्र येऊन लढले, तरी आमच्यासमोर आव्हान नाही. कारण, पुढील वर्षी लोकसभा नंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. तोपर्यंत हे सर्वजण एकत्र राहणे अशक्य आहे. एकत्र राहिले तरी, उमेदवारीवरून वाद होण्याची शक्यता आहे. “चार पक्ष वेगळे लढले, तरी आम्ही एक नंबरलाच राहणार आहोत. थोडाफार मतांमध्ये फटका बसण्याची शक्यता असते. मात्र, आम्ही 200 च्या वरती जागा जिंकू, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

 उध्दव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना भेटता येत नव्हतं; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

“गुजरातमध्ये KKR च्या रिंकू सिंगचं वादळ, शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 षटकार ठोकत, सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”

…तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here